!--Disable Copy And Paste--> Nakshatra Jyotish: महालय श्राद्ध म्हणजे काय ?

Pages

Saturday, October 6, 2012

महालय श्राद्ध म्हणजे काय ?


 ( सौजन्य : http://anusandhan.org ) 


नैमित्तिक कर्म :

निमित्ताने (विशेष दिवसाच्या महत्वामुळे) 

होणारे सत्‌कर्म (भगवंताकडे नेणारे)


१. सण (कुळधर्म-कुलाचार)

२. उत्सव (धार्मिक कार्ये)

३. श्राध्दपक्ष 


४. तीर्थयात्रा

५. कुलदेवतादर्शन 


श्राध्दपक्ष :



श्राद्ध हा शब्द मूळ ‘श्रत:’ या अव्ययाने तयार झाला.श्रद्धया क्रियते तत: श्राद्धम्‌ । -श्रद्धेने, पितरांना उद्देशून विधीवत्‌ हविष्यर्युक्त पिंडप्रदान इत्यादी कर्मे करणे याला श्राद्ध म्हणतात.पितरांना उद्देशून केलेल्या श्राद्धाला पितृयज्ञ म्हणतात. पितर – पितृ (पा) - रक्षणे. पितर आपल्या कुलाचे रक्षण करतात. पितृलोक – चंद्रलोकाच्या वर पितृलोक आहे. (प्रद्यौत) ,सत्यम्‌ ददाति श्रद्धा । - याला वेदांतप्रमाण आहे (कात्यायन स्मृती)


पार्वण श्राध्द  ( पितृपक्षातील महालय श्राद्ध ) :



 पितृपक्षातील (भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाचे पंधरा दिवस) श्राद्धाला ‘पार्वण’ किंवा ‘महालय श्राद्ध’ म्हणतात. या काळात पितरांचा निवास मुलाच्या घरामध्ये असतो. हे पितर पितृलोकातून किंवा प्रेतपुरीहून वायूरूपात येऊन आपला हविर्भाव (भावयुक्त दान) घेतात. या काळात श्राद्ध केल्याने पितर संतुष्ट होतात. त्यांच्या आशीर्वादाने कुळाची वृद्धी होऊन सुख व ऐश्वर्य प्राप्त होते. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अश्विन शुक्ल पंचमी हा श्राद्धाचा उत्तम काळ मानला जातो. कन्या राशीत सूर्याचा प्रवेश झाल्यापासून ते वृश्चिक राशीत सूर्य जाईपर्यंत हे श्राद्ध करावे. 



आपले पितर कोठे कोठे असतात? -


काहीजण पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात.काही पितर ‘द्यु:’ (स्वर्ग) लोकात देवयोनी मिळवतात.काहीजण अंतरिक्षात भूत-प्रेत या योनींमध्ये असतात.श्राद्धामध्ये मंत्रयुक्त श्रद्धेने जे जे दिले जाते ते या तीनही ठिकाणी असणार्‍या आपल्या पितरांना मिळते. पितर ज्या स्वरूपात असतील त्यानुसार योग्य प्रकारचे अन्न त्यांना प्राप्त होते.देवयोनीतील पितर – अमृतरूपाने अन्न मिळते.गंधर्वरूपातील पितर - निरनिराळे भोग मिळतात. 


काम्य श्राद्ध - त्रिपिंडी श्राद्ध :


सलग तीन वर्षे पितरांचे श्राद्ध झाले नाही तर पितरांना प्रेतत्त्व येते. ते दूर होण्याकरता त्रिपिंडी श्राद्ध करावे.