!--Disable Copy And Paste--> Nakshatra Jyotish: Remedies / उपाय

Pages

Showing posts with label Remedies / उपाय. Show all posts
Showing posts with label Remedies / उपाय. Show all posts

Friday, October 19, 2012

सुखी वैवाहिक जीवनासाठी उपयुक्त तोडगे.


वैवाहिक संबंध चांगले रहावेत या साठी उपयुक्त तोडगा :

गणपती या देवतेचे अजून एक नाव सिध्दिविनायक हे असून हि सर्व कार्य सिध्दिस नेणारी देवता आहे.
खालील प्रमाणे गणपतीची उपासना व पूजन केल्यास निश्चितच वैवाहिक संबंधात निर्माण होणारे ताण-तणाव कमी होऊन पती-पत्नी मधील संबंध चांगले राहतात.
१. हि उपासना व पूजन पती अथवा पत्नी या पैकी कोणीही करु शकते.
२. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षामधील बुधवारी हि उपासना व पूजन करणे महत्वाचे आहे.
३. सामुग्री : ५-५ पाने असलेल्या २१ दुर्वा. स्वत:साठी आसन.

४. ऊँ एकदन्ताय विदमहे, वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंन्ती प्रचोदयात
ऊँ वक्रतुण्डाय हुं फट

श्रध्दापूर्वक हा मंत्र प्रत्येक वेळेस उच्चारुन वरील दुर्वांपैकी २-२ दुर्वा १० वेळा गणपतीच्या मूर्तीस अथवा तस्वीरीस वाहणे. शेवटी १ दुर्वा शिल्लक राहिल, वरील मंत्र उच्चारुन ती पण दुर्वा वाहणे. वरील मंत्र एकूण ११ वेळा म्हणावा.
.................................................................................................
वैवाहिक जीवनामधील अडथळे दूर होण्यासाठी उपयुक्त तोडगा :

 खालील प्रमाणे दुर्गा मातेची उपासना व पूजन केल्यास निश्चितच वैवाहिक जीवनात निर्माण होणारे अडथळे दूर होऊन पती-पत्नी मधील संबंध चांगले राहतात. संसार सुखाचा होतो.
१. जेथे दुर्गा मातेची उपासना व पूजन करणार आहात तो परिसर गोमूत्र अथवा गंगेच्या पवित्र जलाने शुध्द करुन घ्यावा.
२. सामुग्री : लाकडी डब्बा, सव्वा मीटर तांबडया रंगाचे वस्त्र (कापड), दिवा, स्वत:साठी आसन.
३. कापडाच्या चार घड्याकरुन लाकडी डब्यावर अंथरावे. यावर देवीची मूर्ती अथवा तस्वीर ठेवावी. शेजारी दिवा लावून ठेवावा.

४. ऊँ ह्रीं क्लीं हुं मातड्ग्यैं फट स्वाहा या मंत्राचा २१ वेळा श्रध्दापूर्वक जप करावा.

५. वरील मंत्राचा जप कमीत कमी २१ दिवस करावा. परिणाम जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त दिवस करण्यास हरकत नाही. व तसेच वरील उपासना शुक्रवारी शुभ दिवस पाहून सुरुवात करावी.

॥ शुभं भवतु ॥


Thursday, October 18, 2012

हरवलेली व्यक्ती / वस्तु लवकर सापडावी या साठी उत्तम उपाय .


व्यक्ती अथवा वस्तु हरवली असल्यास ती लवकर सापडावी या साठी उत्तम उपाय.  


कोणी व्यक्ती पळून गेली 
अथवा हरवली असल्यास 
खालील प्रमाणे कृती करावी.


कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान ।
तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥
हा मंत्र एका कागदावर लिहून काढावा. ध्यानस्थ होऊन १०८ वेळा वरील मंत्राचा जप करावा.
त्यानंतर तो कागद हरवलेल्या व्यक्तीची नेहमीची झोपावयाची जी जागा असेल त्या ठिकाणी रात्रीच्यावेळी जमिनीला स्पर्श होईल असा ठेवावा व त्यावर एखादा पाट अथवा लाकूड ठेवावे
वरील कृतीमुळे पळून गेलीली अथवा हरवलेल्या व्यक्तीच्या कानात कोणीतरी "घरी चल... घरी चल..." असे सतत म्हणत असते.परिणामी ती पळून गेलीली अथवा हरवलेली व्यक्ती घरी परत येते.वस्तु हरवली असल्यास वरील मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास हरवलेली वस्तु सापडते. वरील उपाय करून पाहण्यास हरकत नाही.त्यामुळे झाला तर फायदाच होईल.तोटा निश्चितच नाही.
वरील मंत्राचा उपयोग आपले गेलेले वैभव पूर्ववत होण्यासाठीसुध्दा करण्यास हरकत नाही.

॥ शुभं भवतु ॥

Thursday, October 11, 2012

ग्रहपीडा सुसह्य होण्यासाठी रत्नांऐवजी स्वस्त पर्याय : वनस्पती !


ग्रहपीडा सुसह्य होण्यासाठी रत्नांऐवजी स्वस्त पर्याय : वनस्पती !

 पूर्वसंचित प्रारब्धानुसार भोग कुणालाच चुकले नाहीत. देवाने प्रत्येकाला दु:खाचा ठराविक वाटा दिलेला असतो. हा भोग ज्याने त्याने भोगून संपवावा लागतो. त्यातून कुणाचीच सुटका नसते. प्रत्यक्ष अवतारी पुरषोत्तम प्रभू रामचंद्रांचीही यातून सुटका झालेली नाही. मग सर्व सामान्य माणसाची काय अवस्था ?

भोग भोगायचेच आहेत तर ते निदान सुसह्य होण्यासाठी बुध्दिवादी मनुष्य नेहमीच प्रयत्नशील असतो. हे भोग सुसह्य होण्यासाठी आपल्या पूर्वाचार्यांनी, ॠषीवर्यांनी असंख्य मार्ग सांगितले आहेत. ग्रहपीडा कमी करण्यासाठी आपल्या पूर्वाचार्यांनी खालील उपाय सांगितले आहेत.

१) शुभग्रहांची रत्ने वापरणे, २) इष्ट देवतांची प्रार्थना करणे, ३) ग्रहांचे जप करणे, ४) दानधर्म वा अन्नदान करणे, ५) सत पुरुषाचे दर्शन घेणे, ६) गंगास्नान करणे, ७) शुभमुहुर्त पाहून कार्य करणे, ८) शुभ रंगाचे कपडे वापरणे, ९) शुभ अंक वा शुभांक उपयोगात आणणे, १०) योगासने करणे, ११) मंतरलेले दोरे वा ताईत वापरणे, १२) ग्रहांच्या वनस्पती शरीरावर धारण करणे. इ

या पैकी शुभग्रहांची रत्ने धारण करणे हा एक सोयीचा पर्याय आहे. परंतू खरी रत्ने खूपच महाग असल्याने ती सर्वांनाच परवडतील असे नाही. ब-याचदा खरी रत्ने परवडत नाहीत म्हणून कृत्रिम रत्ने वापरली जातात.याचा कितपत उपयोग होतो याची कल्पना नाही. हि रत्ने ज्यांना परवडत नाहीत त्यांनी त्या त्या ग्रहंच्या वनस्पती शरीरावर धारण करण्यास आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले आहे. या योगे ग्रहपीडा दूर होते. वनस्पती व ग्रह यांचा संबंध खालील प्रमाणे आहे.

१ ) रवी : बेलमूळ
२) चंद्र : खिरणीचे मूळ
३) मंगळ : नागजिव्हा
४) बुध : वरधारा
५) गुरु : भारंगमूळ 
६) शुक्र : वाघंटीचे मूळ
७) शनी : वांच्छील
८) राहू : मलय चंदन 
९) केतू : अश्वगंधा.

या सर्व वनस्पती काष्टौषधी औषधाच्या दुकानात सहजपणे व सर्वांना परवडेल अशा किंमतीत उपलब्ध होऊ शकतात.

ज्योतिषमार्तंड कृष्णमूर्ती यांच्या मते तुमच्या पत्रिकेतील जे ग्रह बलवान असून तुम्हाला अपेक्षीत फल देणार आहेत, त्या ग्रहांचीच रत्ने अथवा वनस्पती धारण करावीत. अशा वेळी जन्म पत्रिकेत चालू असलेली महादशा – अंतर्दशा यांचाही विचार अवश्यक ठरतो.

( संदर्भ : कृष्णमूर्ती सिध्दांत - कै. ज्योतींद्र हसबे.)

Wednesday, October 10, 2012

कर्जफेडीसाठी रामबाण उपाय...


कर्जफेडीसाठी रामबाण उपाय...

पूर्वी कर्जबाजारी माणसाला समाजात मान नसे. कर्जबाजारी होणे ही समाजात अवमानीत करणारी घटना होती. सध्या समाज जीवन बदलले आहे. त्यामुळे आजकाल कर्ज घेण्यात कमीपणा राहिलेला नाही हे जरी खरे असले तरी  पत्रिकेतील काही विशिष्ट ग्रहयोग हे कर्जबाजारीपणा दर्शवितातच.

खरे तर सर्वसामान्य मनुष्य अडचणीत आल्यानंतरच कर्ज घेण्यास प्रवृत्त होतो. स्वत:च्या चैनीसाठी कर्ज घेणारे क्वचितच असतात. कधी-कधी दैव व प्रतिकूल ग्रहयोगामुळे त्यास घेतलेल्या कर्जाचे  व्याज भरणे सुध्दा अत्यंत त्रासदायक ठरते. समजा हेच कर्ज खाजगी साव-सावकारांकडून घेतले असेल आणि त्यांचे वेळोवेळी कर्जाचे हप्ते व व्याज फेडले नाही तर त्या पासून होणारा मनस्ताप या बद्दल कल्पना न करणेच योग्य...

लवकरात लवकर कर्जमुक्त व्हावे असे सर्वांनाच वाटत असते, असे वाटणे काहि गैर नाही. कर्जमुक्ती लवकर व्हावी यासाठी एक सोपा उपाय सुचवित आहे.

उपाय :
§  गरजेपेक्षा कर्जाची रक्कम अधिक घ्या.
§  समजा तुम्हास रु : १०००/-  रक्कमेवी गरज असल्यास रु : १२००/-  रक्कमेचे कर्ज घ्या.

§  या रक्कमेपैकी अधिक घेतलेले रु: २००/- खर्च करु नका. कर्जाच्या परतफेडीसाठी बाजूला काढून ठेवा.

§  ज्या दिवशी अश्विनी नक्षत्रात चंद्र जाईल त्या दिवशी मेष लग्न उदीत असताना वरील रु: २००/-  कर्जफेडीचा पहिला हप्ता म्हणून परत करा.

§  किंवा ज्या दिवशी अनुराधा नक्षत्रात चंद्र जाईल त्या दिवशी वृश्चिक लग्न उदीत असताना वरील रु: २००/-  कर्जफेडीचा पहिला हप्ता परत करा.

§  व्यतिपात योग असताना कधीच कर्ज घेऊ नका वा देऊ नका. हा योग पंचांगात दाखविलेला असतो.

वरील प्रमाणे उपाय केल्यास तुमचे कर्ज सहजगत्या फिटेल. तुम्ही कर्जमुक्त व्हाल. अर्थात जे सुदैवी असतात तेच लोक हा सल्ला मानतात हा भाग वेगळा.....

( संदर्भ : कृष्णमूर्ती सिध्दांत - कै. ज्योतींद्र हसबे.)



Friday, October 5, 2012

पंचायतन उपासना व पूजन.


 भारतीय संस्कृती सर्वग्राही तशीच सर्वसहिष्णु आहे. मानवाने ईश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार केल्यानंतर त्याने ईश्वराची कॊणत्या स्वरूपात पूजा करावी ह्यासाठी भारतीय संस्कृतीचा कोणताही आग्रह नाही. भगवंताची सर्वच रूपे सुंदर आणि मनोहारी आहेत. ज्याचे मन ज्या रूपात आकर्षित होते त्याने त्या रूपाची पूजा करावी.
विभिन्न उपास्य देवांना मानीत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली. ह्या पद्धतीनुसार समाजात गणपती, शिव, हरी (विष्णू), तेज (भास्कर) आणि अंबा ह्या पाच देवांचे पूजन होते. ह्या पाच देवतांतून उपासक ज्याला प्रधान मानीत असेल त्याला मुख्य स्थान देऊन आजूबाजूला दुसरे चार देव ठेवून पूजा करायची. याच्या परिणामी 'गणेश पंचायतन', 'शिव पंचायतन' वगैरे सुरू झाले. पंचायतन पूजापद्धतीने माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि समाजात असलेला विभिन्न संप्रदायांमधील राग द्वेषही कमी झाला.
मानवी विकासात बुद्धी, ज्ञान, लक्ष्मी, तेज आणि शक्ती ह्या पाच तत्त्वांचीच आवश्यकता असते. गणपती उपासना बुद्धीप्राप्ती साठी, शिव उपासना ज्ञानप्राप्ती साठी, हरी उपासना (विष्णू) लक्ष्मीप्राप्ती साठी, सूर्य उपासना तेजप्राप्ती साठी, अंबा उपासना शक्तीप्राप्ती साठी. खालील प्रमाणे प्रत्येक देवतांचा नित्यनियमित जप, तसेच या सर्व देवतांचे पूजन योग्य रितीने समजून केले तर पंचायतन पूजा अतिशय शास्त्रीय आहे. अशी श्रेष्ठ पंचायतन पूजा समाजात पुन्हा शास्त्रीयरीत्या सुरू झाली तर त्याने सर्वांना परम कल्याण साध्य होईल.

गणपती मंत्र : ॥ ॐ गं गणपतये नम: ॥ (रोज १०८ वेळा जप करावा.)
गणपती गायत्री :-|| एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात  ||
(रोज १० वेळा जप करावा.)

शिव मंत्र : ॥ ॐ नमः शिवाय ॥ (रोज १०८ वेळा जप करावा.)
शिव गायत्री :-|| ॐ तत्पुरुषाय विद्महे। महादेवाय धीमहि। तन्नो रुद्रः प्रचोदयात ||
(रोज १० वेळा जप करावा.)

विष्णू मंत्र : ॥ ॐ नमो नारायणाय ॥ (रोज १०८ वेळा जप करावा.)
विष्णू गायत्री :- || ॐ नारायण विद्महे, वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात ||
(रोज १० वेळा जप करावा.)

सूर्य मंत्र : ॥ ॐ भास्कराय नम: ॥ (रोज १०८ वेळा जप करावा.)
सूर्य गायत्री :- || आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो  सूर्य: प्रचोदयात ||
(रोज १० वेळा जप करावा.)

अंबा मंत्र : ॥ ॐ श्री दुर्गाये नम: ॥ (रोज १०८ वेळा जप करावा.)
अंबा गायत्री :- || ॐ महादेव्यै विद्महे दुर्गायै धीमहि तन्नो देवी प्रचोदयात  ||
(रोज १० वेळा जप करावा.)

Thursday, October 4, 2012

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त स्तोत्र

  ||प्रज्ञा विवर्धन कार्तिकेय स्तोत्र ||


श्री गणेशाय नमः


श्री स्कन्द उवाच


योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनंदनः |



स्कन्दः कुमारः सेनानी स्वामी शंकरसम्भवः ||


गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः |

तारकारिरुमापुत्रः क्रौञ्चारिश्च षडाननः ||

शब्दब्रह्म समुद्रश्च सिद्धः सारस्वतो गुहः |

सनत्कुमारो भगवान् भोग मोक्ष फलप्रदः ||

शरजन्मा गुणादीशः पूर्वजो मुक्ति मार्गकृत् |

सर्वागम प्रणेता च वाञ्छितार्थ प्रदर्शनः ||

अष्टाविंशति नामानि मदीयानीति यः पठेत् |

प्रत्यूषम् श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ||

महामन्त्रमया नीति मम नामानुकीर्तनम् |

महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ||

|| इति श्री रुद्रयामले प्रज्ञाविवर्धनाख्यम् श्रीमत्कार्तिकेयस्तोत्रम् संपूर्णम् ||

हे स्तोत्रं औन्दुम्बाराच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली

बसून २८ दिवस २८ वेळा पठण केल्यास निर्बुध्द व्यक्ती बुध्दिवान होते.

तसेच मुक्यांना वाचस्पती करण्याचे सामर्थ्य या मंत्रात आहे.