!--Disable Copy And Paste--> Nakshatra Jyotish

Pages

Saturday, October 13, 2012

विवाहमेलन आणि वैवाहिक सौख्य.....


विवाहमेलन आणि वैवाहिक सौख्य.....

 विवाह हा एक पवित्र संस्कार हिंदू धर्माने मानला आहे. विवाहसंबंध केवळ विषय भोगाकरिता व लौकिक व्यवहाराकरीता घडत नाही. तर धर्माचरणासाठी स्त्री व पुरुष एकमेकांचा पती-पत्नी या नात्याने केलेला अंगिकार, स्त्री व पुरुष या दोन हृदयाचे दृढ संमेलन म्हणजेच विवाह .

विवाह स्वर्गातच निश्चित झालेले असतात ते आपण पृथ्वीवर साजरे करतो हे जरी खरे असले तरी परमेश्वराने मनुष्यास सर्व प्रकारचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी बुध्दि दिलेली आहे. अज्ञानाने केलेले कोणतेच कार्य चांगले नसते हा प्रत्यक्ष नियम आहे. ज्ञान हे सर्व सुखाचे व उन्नतीचे मूळ आहे म्हणून ज्योतिषशास्त्राधारे वधू-वराच्या पत्रिकेचे गुणमेलन ज्ञात करुन वा तपासून विवाह केल्यास वधू-वराचा संसार सुखी होईल.

तुम्हाला जर पंचांगावरुन गुणमेलन कसे पहावयाचे हे जरी कळत असले तरी वधू-वराचा विवाह ठरेल किंवा नाही हे सांगण्याचे आवश्य टाळा. कदाचित अनुभवी ज्योतिषाएवढे त्या बद्दल ज्ञान नसल्याने तुमच्या सल्ल्यामुळे अशा विवाहयोगात विवाह-विच्छेद, मतभिन्नता, मन:स्ताप, पश्चाताप यापैकी काहीही घडू शकते. या पैकी आपल्या वाटणीस काही येऊ नये असे वाटत असेल तर अनुभवी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्या. आपणच पंचांगावरुन गुणमेलन करु नका.

ज्योतिषीसुध्दा पंचांगावरुन गुणमेलन करतो. पण त्याचबरोबर तो उभयतांच्या पत्रिकेमधील ग्रहमैत्री, येणारा भावी काल यांचा विचार करतो. कारण विवाहानंतर सहा महिन्यात मृत्युयोग असलेल्या पत्रिकेत अगदी ३६ गुण जमूनही काय उपयोग ? खरे तर पत्रिका पाहताना आयुष्य, आरोग्य, आर्थिक सुस्थिती, भावीकाल, संतती व सुख इ. गोष्टी विचारात घेऊन उभयतांच्या पत्रिकेमधील गुणमेलन करावे.

आयुष्य : वधू-वराच्या पत्रिकेत दीर्घायुषी योग असावेत. वैवाहिक सौख्य काही काळच असलेली कुंडली कितीही उत्तम असली तरी उपयोग  काय ?

आरोग्य : माणसाचे आरोग्य चांगले असेल तरच तो जीवनातील सर्व गोष्टींचा आस्वाद निर्भेळपणे घेऊ शकतो. नवरा लखपती आहे पण वर्षातील सहा-सहा महिने क्षयाच्या आरोग्यधामात राहणार असेल तर काय उपयोग? विवाहानंतर महारोगासारखे विकार होणार असतील तर अशी पत्रिका त्याज्य ठरवावी हेच उत्तम.  

आर्थिक सुस्थिती : मुलगा खुप देखणा आहे, प्रकृती उत्तम आहे. पण त्याच्या उपजिविकेचे साधनच जर दुबळे असेल तर कोणत्या भरवशांवर मुलगी या ठिकाणी देणार ? निदान आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची क्षमता त्या मुलाजवळ असायला हवी. निदान मुलगी देताना तरी आर्थिक क्षमता चांगली असावी. पुढे तिच्या नशिबाचा भाग.

भावीकाल : पत्रिकेतील शुभसूचक कालखंडाचा सुगावा ज्योतिषांना लागतोच अशावेळी त्यांनी सुचविलेले स्थळ जरुर निवडावे. कारण आजची ओढाताण म्हणजे पहाटेपूर्वीचा काळोख असतो. लवकरच भाग्याचा सूर्य उगवणार असतो.

संतती : विवाहचा मुख्य उद्देशच प्रजोत्पादन असतो. वर व वधू या दोघांच्या पत्रिकेत संततीसौख्य योग ह्वाच. संतान नसेल तर आयुष्य निरस होते. उत्साह मावळतो. मनुष्य कितीही श्रमलेला, थकलेला असो, समोर हसरी मुले पाहिल्यावर त्याचा श्रम परिहार होतो.

सुख : संसार कावळे-चिमण्याही करतात. परंतू असा संसार येथे अभिप्रेत नाही. या संसारत दोघांचे स्वभावधर्म एकमेकांशी जुळते हवेत. नाहीतर वरील पाच गोष्टींची अनुकुलता असून उपयोग काय ? यासाठी वैवाहिक जीवनात समाधान हवे असेल तर पत्रिका गुणमेलन करताना वरील सहा मुद्दे विचारात घेऊनच गुणमेलन करावे.

वरील सर्व मुद्दे समाधानकारक असतील तर, गुण १८ पेक्षा कमी असले तरी पत्रिका जमविण्यास हरकत नाही.

( संदर्भ : कृष्णमूर्ती सिध्दांत - कै. ज्योतींद्र हसबे.)


Friday, October 12, 2012

कुलधर्म-कुलाचार म्हणजे काय ? कुलधर्म केला नाही तर काय घडते ?


कुलधर्म-कुलाचार म्हणजे काय ? कुलधर्म केला नाही तर काय घडते ?

 कुळधर्म ज्ञान कुळधर्म सधन । कुळधर्म निधान हाती चढे ।।१।।
कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ।।२।।
कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनांचे ।।३।।
कुळधर्म महत्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकीचे ।।४।।
तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव । यथाविध भाव जरी होय ।।५।।
--तुकाराम महाराज.

आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात.

कुळधर्म म्हणजे समाज व्यवस्थेतील कर्तव्यांचे पालन करण्यासाठी व समाज व्यवस्था टिकण्यासाठी केलेले अलिखित नियम होय. धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य करणे ते पार पाडणे असाही आहे म्हणून आपआपल्या घराण्यातील परंपरेने चालत आलेले धर्मविधी किंवा चालीरीती पार पाडणे म्हणजेच कुलधार्माचे पालन करणे.

हिंदू धर्मीयांमध्ये प्रत्येक कुळाची म्हणजेच घरण्याची काही वैशिष्ठे असतात काही वेगळेपण तर काही साम्य असतात.प्रत्येक घराण्याला स्वतःचे दैवत,स्वतःचे आचार विचार असतात.यामध्ये भौगोलिक रचनेपरत्वे,आर्थिक कुवतीनुसार आदी गोष्टीमुळे बदल घडू शकतात.

कुलधर्म केला नाही तर काय घडते ?

याविषयी श्रीमत्‌भगवत्‌गीतेतील पहिल्या अध्यायात अर्जुनाने सविस्तर वर्णन केलेले आहे.
अधर्म माजतो. वर्णसंकर होतो. (भिन्न व्यवसायामध्ये लग्न होतात.), श्राध्दपक्ष होत नाहीत. त्यामुळे पितरांना तिलोदक मिळत नाही. परिणामी ते प्रेतयोनीमध्ये जातात. तिथे त्यांना असह्य त्रास सहन करावा लागतो. त्यांना मनुष्यजन्म न मिळाल्यामुळे मोक्षाची संधी प्राप्त होत नाही. त्यांचे शाप त्यांच्या वंशजांना लागतात. त्यामुळे अजून अधर्म घडत जातो.

आईवडिल, घरातील वृध्द यांचा अपमान होतो, त्यांची अवहेलना, कुचंबणा होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, त्यांचे शाप लागतात. कुलदेवतांची, नवग्रहांची, अष्टदिक्पालांची, क्षेत्रदेवतांची, ब्रह्मादीमंडलाची पूजा होणे, त्यांना तूपाची आहूति मिळणे त्यातून त्यांची तृप्ती होणे हे मनुष्य जन्माचे कर्तव्य आहे. ते कुळाचाराद्वारा घडत असते. जर कुलाचार केले नाहीत तर देवतांना त्यांचा हविर्भाग मिळत नाही. या अपदेवता असल्याने त्या नाराज होतात व त्यांचे शाप घराण्याला लागतात.

दीनदुःखी, असहाय्य, पीडीत, वारकरी, साधू-संन्यासी-अतिथी, तडी-तापसी, वैदिक पाठशाळेत शिकणारे बटू, पशुपक्षी विशेषतः गाई यांची सेवा गृहस्थधर्मात करावी असा दंडक आहे. हा धर्म कुलाचार करताना आपोआप होतो. अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा, जलपान, आसरा इ. कर्म घडतात. जर कुलाचार केले नाहीत तर समाजातील या घटकांना आसराच राहणार नाही. परिणामी गोहत्या, अतिथीचा अपमान, अवहेलना होते. कर्तव्य न केल्याचे व अधर्म केल्याचे पाप लागते ज्याला कठोर प्रायश्चित्त आहे.

अशा शापित घराण्यामध्ये कोणते अनाचार घडतात ?

भ्रूणहत्या.
अपमृत्यू (अकाली मृत्यू)
दुर्मरण (भाजून, अपघाताने, आत्महत्येने, बुडून, खितपत पडून, खून झाल्याने)
घरात भांडणे होणे,
सुवासिनीला पीडा होणे (डोळ्यात पाणी येणे, अन्न गोड न लागणे, खिन्नता येणे, भीती वाटणे, स्वप्नात साप दिसणे, स्वप्नात अघटित घडताना दिसणे, सतत अस्वस्थता असणे), सवतीचा त्रास होणे (यजमानाचे संसारातले लक्ष उडणे)
घरातून व्यक्ती पळून जाणे (तरणीताठी मुलगी/मुलगा, म्हातारी व्यक्ती, प्रमुख व्यक्ती)
धंद्यात नुकसान होणे. कर्ज होणे, वसुलीसाठी माणसे घरी येणे. कोर्ट कचेर्‍या मागे लागणे
नोकरी जाणे, प्रमोशन न मिळणे, कामात लक्ष न लागणे, कामाच्या ठिकाणी त्रास होणे.
सततची आजारपणे घरात असणे,
लहान मुलांना त्रास होणे (झोपेत ओरडत उठणे, अभ्यासात लक्ष न लागणे)
वाममार्गाला लागणे (परदारा-परधन-परनिंदा)
 घरात सतत अशांति असणे.
 लग्ने मोडणे, घटस्फोट होणे.

म्हणूनच या बाबत संत ज्ञानेश्वर माउलीनी सर्व जनतेस स्पष्ट संदेश दिला आहे,

कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा  सर्वथा न करावा अनाचार --ज्ञानेश्वरी

कुळाचा कुळधर्म आवश्य पाळावा कुठेही अनाचार करू नये, कुळाचे नाव सर्वतोपरी उंचावण्याचे कार्य करावे कुलाच्या नावलौकिकाला कोणताही डाग डाग लागणर नाही याची काळजी घ्यावी समाज विघातक कृत्य करू नये.

कुळधर्माचे उपयुक्तता सांगताना संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात

कुळधर्मु चाळी विधिनिषेध पाळी मग सुखे तुज सरळी दिधली आहे  --ज्ञानेश्वरी

आपला कुलधर्म पाळावा, कुलाचारांचे आचरण करावे तसेच शास्त्रांनी सांगितलेली सत्कर्मे जरूर करावीत व ज्या कर्मांचा निषेध केला आहे ती कर्मे टाळावीत इतके केले म्हणजे सुखाने वागावयास मोकळीक आहे.

वंश परंपरेने आलेले रूढी रिती रिवाज तसेच दैवते यांना कुळधर्मामध्ये अनन्य साधारण महत्व असते.या संदर्भात समर्थ रामदास स्वामीनी ग्रंथराज दासबोध मध्ये सांगितले आहे.

याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम  उत्तम अथवा मध्यम करीत जावे  --दासबोध

आपले कुळधर्म आणि कुलाचार जसे परंपरेने चालत आले असतील, तसे सुरु ठेवावेत याशिवाय आपल्या घरी जे कुळधर्म असतील ते जसे चालत आले असतील ते उत्तम किंवा मध्यम असोत आपण ते करीत राहावे.

( सौजन्य व संदर्भ :१) http://kuldharma.blogspot.in/p/blog-page_29.html, २) http://www.anusandhan.org )

Thursday, October 11, 2012

ग्रहपीडा सुसह्य होण्यासाठी रत्नांऐवजी स्वस्त पर्याय : वनस्पती !


ग्रहपीडा सुसह्य होण्यासाठी रत्नांऐवजी स्वस्त पर्याय : वनस्पती !

 पूर्वसंचित प्रारब्धानुसार भोग कुणालाच चुकले नाहीत. देवाने प्रत्येकाला दु:खाचा ठराविक वाटा दिलेला असतो. हा भोग ज्याने त्याने भोगून संपवावा लागतो. त्यातून कुणाचीच सुटका नसते. प्रत्यक्ष अवतारी पुरषोत्तम प्रभू रामचंद्रांचीही यातून सुटका झालेली नाही. मग सर्व सामान्य माणसाची काय अवस्था ?

भोग भोगायचेच आहेत तर ते निदान सुसह्य होण्यासाठी बुध्दिवादी मनुष्य नेहमीच प्रयत्नशील असतो. हे भोग सुसह्य होण्यासाठी आपल्या पूर्वाचार्यांनी, ॠषीवर्यांनी असंख्य मार्ग सांगितले आहेत. ग्रहपीडा कमी करण्यासाठी आपल्या पूर्वाचार्यांनी खालील उपाय सांगितले आहेत.

१) शुभग्रहांची रत्ने वापरणे, २) इष्ट देवतांची प्रार्थना करणे, ३) ग्रहांचे जप करणे, ४) दानधर्म वा अन्नदान करणे, ५) सत पुरुषाचे दर्शन घेणे, ६) गंगास्नान करणे, ७) शुभमुहुर्त पाहून कार्य करणे, ८) शुभ रंगाचे कपडे वापरणे, ९) शुभ अंक वा शुभांक उपयोगात आणणे, १०) योगासने करणे, ११) मंतरलेले दोरे वा ताईत वापरणे, १२) ग्रहांच्या वनस्पती शरीरावर धारण करणे. इ

या पैकी शुभग्रहांची रत्ने धारण करणे हा एक सोयीचा पर्याय आहे. परंतू खरी रत्ने खूपच महाग असल्याने ती सर्वांनाच परवडतील असे नाही. ब-याचदा खरी रत्ने परवडत नाहीत म्हणून कृत्रिम रत्ने वापरली जातात.याचा कितपत उपयोग होतो याची कल्पना नाही. हि रत्ने ज्यांना परवडत नाहीत त्यांनी त्या त्या ग्रहंच्या वनस्पती शरीरावर धारण करण्यास आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले आहे. या योगे ग्रहपीडा दूर होते. वनस्पती व ग्रह यांचा संबंध खालील प्रमाणे आहे.

१ ) रवी : बेलमूळ
२) चंद्र : खिरणीचे मूळ
३) मंगळ : नागजिव्हा
४) बुध : वरधारा
५) गुरु : भारंगमूळ 
६) शुक्र : वाघंटीचे मूळ
७) शनी : वांच्छील
८) राहू : मलय चंदन 
९) केतू : अश्वगंधा.

या सर्व वनस्पती काष्टौषधी औषधाच्या दुकानात सहजपणे व सर्वांना परवडेल अशा किंमतीत उपलब्ध होऊ शकतात.

ज्योतिषमार्तंड कृष्णमूर्ती यांच्या मते तुमच्या पत्रिकेतील जे ग्रह बलवान असून तुम्हाला अपेक्षीत फल देणार आहेत, त्या ग्रहांचीच रत्ने अथवा वनस्पती धारण करावीत. अशा वेळी जन्म पत्रिकेत चालू असलेली महादशा – अंतर्दशा यांचाही विचार अवश्यक ठरतो.

( संदर्भ : कृष्णमूर्ती सिध्दांत - कै. ज्योतींद्र हसबे.)

Wednesday, October 10, 2012

मला उमजलेले वास्तुशास्त्र .

मला उमजलेले वास्तुशास्त्र .
मूळ "वस" या संस्कृत धातूपासून वसति, वस्तू, वास्तु अशी अर्थवाहक शब्दनिष्पत्ती प्रचलित झाली. खरेतर ऊन, पाऊस, वारा, अग्नि, हिंस्त्रश्वापदे व तसेच अन्य वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे, या सर्वांवर मात करण्यासाठी एखादे सुरक्षा कवच असावे म्हणून त्यावेळी मानवाने निसर्गाशी जवळीक साधून, निसर्ग नियमांशी, सृष्टीच्या रचनेशी बांधिलकी असलेले घर बांधून तो तेथे राहू लागला.अशा या नियमांशी,सृष्टीच्या रचनेशी बांधिलकी असलेली वास्तुनिर्मितीची प्रणाली म्हणजे "वास्तुशास्त्र" होय.  मुख्य दिशा, उपदिशा, पंचमहाभूते यांचे गुणधर्म व यामधील परस्पर संबंध हा वास्तुशास्त्राचा गाभा आहे.

वास्तुशास्त्र हे भारतीय दर्शन शास्त्राचे उपांग आहे. संगीत, योग, आयुर्वेद, ज्योतिष व वास्तुशास्त्र ही दर्शनशास्त्राची पाच उपांगे आहेत. खरे तर वास्तुशास्त्र हे आयुर्वेदासारखे आहे.  जसे आयुर्वेदात “ पंचकर्म, प्राणायाम व ध्यान इ. दिनचर्येचेच भाग बनविले तर आजारपण क्वचितच येईल “ म्हणजेच “प्रिव्हेंन्शन इज बेटर दॅन क्युअर”. वास्तुशास्त्राचा देखील हाच पाया आहे. वास्तुशास्त्राचा अति मह्त्वाचा गाभा कोणता असेल तर तो म्हणजे वास्तुज्योतिष (Astro Vastuआणि वास्तु शिल्पकार. (Vastu Planner.)

वास्तुज्योतिष  (Vastu Jyotish)
ज्योतिषशास्त्राधारे जातकाच्या जन्मकुंड्ली अथवा प्रश्नकुंड्लीमध्ये कोणत्याही प्रकारे "वास्तुदोष" आढळल्यास धार्मिक उपाय किंवा देव-देवतांच्या उपासनेने वास्तुदोषाचे निवारण करणे म्हणजेच "वास्तुज्योतिष"वास्तुदोष" याचा अर्थ आपण ज्या वास्तूत किंवा घरात राहतो त्या वास्तूचा किंवा घराचा दोष असा शब्दश: अर्थ न घेता आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या किंवा आपल्या पूर्वजन्मातील चुकांमुळे किंवा दुष्कृत्यांमुळे "वास्तुदोष" निर्माण होतो. तो जन्मकुंडली अथवा प्रश्नकुंडलीव्दारा प्रतिबिंबीत होतो. यालाच ज्योतिषशास्त्रात "वास्तुदोष" असे म्हणतात.

जन्म अथवा प्रश्न कुंडली मधील चतुर्थ स्थानावरून ’वास्तुयोग ’ व ’वास्तुसौख्य ’ यांचा विचार केला जातो. कुंडलीत काहि दोष अढळल्यास, ग्रहांची शांती करुन अथवा त्या संबंधीत देव-देवतांची उपासना करुन हा कुंडलीमधील दोष समूळ नष्ट करता येतो. तसेच या चतुर्थस्थानावरुन वास्तुच्या मुख्य प्रवेशव्दाराची दिशा ठरविता येते. प्रत्येकास दक्षिणाभिमुख प्रवेशव्दार अशुभच असते असे नाही. 

नविन वास्तुचे बांधकाम करण्यापूर्वी ज्योतिषांनी सांगितलेल्या मुहूर्तावर बांधकाम करणे अत्यंत मह्त्वाचे असून या शुभ मुहूर्तामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरु झाल्यानंतर येणारी संकटे सुसह्य होतात. बांधकाम पूर्ण झाल्यावर या नूतन वास्तूत राहण्यापूर्वी शुभ मुहूर्तावर वास्तुशांती करणे अत्यंत मह्त्वाचे आहे.

हि नूतन वास्तु निर्मितीसाठी ज्या ज्या व्यक्तींचा हातभार लाभला आहे उदा. कामगार, मालाचा पुरवठा करणारे इ. वास्तुशांतीच्या दिवशी खास निमंत्रित करुन त्यांचा आदर-सत्कार करणे हे नवग्रह शांती ऐवढेच अत्यंत महत्वाचे आहे. तसेच या नूतन वास्तुमध्ये सुख, शांती, स्थैर्य लाभावे म्हणून त्यांचे अशिर्वाद देखिल अत्यंत मह्त्वाचे आहेत.   

वास्तु शिल्पकार. (Vastu Planner)
विज्ञान, तंत्रज्ञान, पंचमहाभूते, सर्व दिशा, उपदिशा, ग्रह व संबंधीत देवता यांची सांगड घालून तयार केलेल्या वास्तुनकाशाचा निर्माता म्हणजेच         “वास्तु शिल्पकार(Vastu Planner)  अश्या वास्तुनिर्मितीमुळे मनाला समाधान व शांतता मिळते. 

उत्तम वास्तुनिर्मितीसाठी उत्तम जागा असणे महत्वाचे आहे. जागेचा आकार हा शक्यतो आयताकृती किंवा चौरस असावा कारण इतर आकाराच्या जागेत वास्तुचा नकाशा करताना खोल्यांचे आकारमान आयताकृती किंवा चौरस नसल्याने बरीच जागा वाया जाते, विस्कळीतपणा येतो त्यामुळे मन प्रसन्न राहणार नाही. काळी माती असलेल्या जागेपेक्षा मुरमाड असलेली जागा अतिशय उत्तम, कारण इमारतीच्या पायासाठी होणारा खर्च इतरमानाने कमी असतो. पाण्याचा साठा असलेल्या जागेत घर बांधू नये कारण त्या पासून धोका निर्माण होतो व आरोग्यास अपायकारक असते. 

देऊळ, मशिद, चर्च इ. अति रहदारीच्या ठिकाणी जागा घेऊन वास्तुनिर्मिती केल्यास हवा व आवाजाचे प्रदुषण यामुळे अनारोग्य व अशांतताच नशिबी येते. दशदिशांचे अधिपती, त्यांच्या देवता, त्यांना प्रिय असलेल्या दिशा व वास्तुपुरुष या सर्वांचा विचार करुन वास्तुनिर्मिती केल्यास वास्तुपुरुषाची या वास्तुवर अखंड कृपा राहते. 

हे वैज्ञानिक व तांत्रिक युग असून नियोजीत वास्तु मध्ये मुबलक खेळती हवा, उजेड,  इमारतीचा सांगाडा, रंगसंगती या साठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा समतोल साधला असता उत्तम वास्तुनिर्मिती होऊ शकते. नियोजीत वास्तु ज्या ठिकाणी बांधावयाची आहे त्या ठिकाणच्या नगर रचनेच्या नियमाप्रमाणे वास्तु बांधल्यास या नियोजीत वास्तुमध्ये मुबलक खेळती हवा व उजेड यामुळे आरोग्यास उपयुक्त अशी वास्तुनिर्मिती होते व त्यामुळे मनाला मानसिक समाधान व शांतता मिळते.  

कर्जफेडीसाठी रामबाण उपाय...


कर्जफेडीसाठी रामबाण उपाय...

पूर्वी कर्जबाजारी माणसाला समाजात मान नसे. कर्जबाजारी होणे ही समाजात अवमानीत करणारी घटना होती. सध्या समाज जीवन बदलले आहे. त्यामुळे आजकाल कर्ज घेण्यात कमीपणा राहिलेला नाही हे जरी खरे असले तरी  पत्रिकेतील काही विशिष्ट ग्रहयोग हे कर्जबाजारीपणा दर्शवितातच.

खरे तर सर्वसामान्य मनुष्य अडचणीत आल्यानंतरच कर्ज घेण्यास प्रवृत्त होतो. स्वत:च्या चैनीसाठी कर्ज घेणारे क्वचितच असतात. कधी-कधी दैव व प्रतिकूल ग्रहयोगामुळे त्यास घेतलेल्या कर्जाचे  व्याज भरणे सुध्दा अत्यंत त्रासदायक ठरते. समजा हेच कर्ज खाजगी साव-सावकारांकडून घेतले असेल आणि त्यांचे वेळोवेळी कर्जाचे हप्ते व व्याज फेडले नाही तर त्या पासून होणारा मनस्ताप या बद्दल कल्पना न करणेच योग्य...

लवकरात लवकर कर्जमुक्त व्हावे असे सर्वांनाच वाटत असते, असे वाटणे काहि गैर नाही. कर्जमुक्ती लवकर व्हावी यासाठी एक सोपा उपाय सुचवित आहे.

उपाय :
§  गरजेपेक्षा कर्जाची रक्कम अधिक घ्या.
§  समजा तुम्हास रु : १०००/-  रक्कमेवी गरज असल्यास रु : १२००/-  रक्कमेचे कर्ज घ्या.

§  या रक्कमेपैकी अधिक घेतलेले रु: २००/- खर्च करु नका. कर्जाच्या परतफेडीसाठी बाजूला काढून ठेवा.

§  ज्या दिवशी अश्विनी नक्षत्रात चंद्र जाईल त्या दिवशी मेष लग्न उदीत असताना वरील रु: २००/-  कर्जफेडीचा पहिला हप्ता म्हणून परत करा.

§  किंवा ज्या दिवशी अनुराधा नक्षत्रात चंद्र जाईल त्या दिवशी वृश्चिक लग्न उदीत असताना वरील रु: २००/-  कर्जफेडीचा पहिला हप्ता परत करा.

§  व्यतिपात योग असताना कधीच कर्ज घेऊ नका वा देऊ नका. हा योग पंचांगात दाखविलेला असतो.

वरील प्रमाणे उपाय केल्यास तुमचे कर्ज सहजगत्या फिटेल. तुम्ही कर्जमुक्त व्हाल. अर्थात जे सुदैवी असतात तेच लोक हा सल्ला मानतात हा भाग वेगळा.....

( संदर्भ : कृष्णमूर्ती सिध्दांत - कै. ज्योतींद्र हसबे.)



॥ नवग्रह स्तोत्र ॥



॥ नवग्रह स्तोत्र  ॥

( कंसात ज्या ग्रहाचे स्तोत्र आहे त्या ग्रहाचे नाव दिले आहे. )

जपाकुसुम संकाशं  काश्यपेयं महद्युतिं ।
तमोरिसर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं ॥  (रवि)

दधिशंख तुषाराभं  क्षीरोदार्णव संभवं ।
नमामि शशिनं सोंमं  शंभोर्मुकुट भूषणं ॥  (चंद्र)

धरणीगर्भ संभूतं  विद्युत्कांतीं समप्रभं ।
कुमारं शक्तिहस्तंच  मंगलं प्रणमाम्यहं ॥  (मंगळ)

प्रियंगुकलिका शामं  रूपेणा प्रतिमं बुधं ।
सौम्यं सौम्य गुणपेतं  तं बुधं प्रणमाम्यहं ॥  (बुध)

देवानांच ऋषिणांच  गुरुंकांचन सन्निभं ।
बुद्धिभूतं त्रिलोकेशं  तं नमामि बृहस्पतिं ॥ (गुरु)

हिमकुंद मृणालाभं  दैत्यानां परमं गुरूं ।
सर्वशास्त्र प्रवक्तारं  भार्गवं प्रणमाम्यहं ॥   (शुक्र)

नीलांजन समाभासं  रविपुत्रं यमाग्रजं ।
छायामार्तंड संभूतं  तं नमामि शनैश्वरं ॥  (शनि)

अर्धकायं महावीर्यं  चंद्रादित्य विमर्दनं ।
सिंहिका गर्भसंभूतं  तं राहूं प्रणमाम्यहं ॥  (राहू)

पलाशपुष्प संकाशं  तारका ग्रह मस्तकं ।
रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं ॥  (केतु)

फलश्रुति :

इति व्यासमुखोदगीतं  य पठेत सुसमाहितं ।
दिवा वा यदि वा रात्रौ  विघ्नशांतिर्भविष्यति ॥
नर, नारी, नृपाणांच। भवेत् दु:स्वप्न नाशनं ॥
ऐश्वर्यंमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनं ॥
ग्रह नक्षत्रजा पीडास्तस्कराग्नि समुद्भवा ।
ता: सर्वा: प्रशमं यान्ति व्यासो ब्रुतेन संशय: ॥

इति श्री व्यासविरचित ।
आदित्यादि नवग्रह स्तोत्रं संपूर्णं ॥

अहंकार...


॥ आद्य शंकराचार्य ॥
 शंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती आरंभिली. तो म्हणाला, 'आचार्य अहो केवढे ज्ञान आहे आपल्याजवळ ! ही अलकनंदा समोरून वाहत आहे ना! कसा पवित्र प्रवाह खळखळत वाहत आहे! याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान आपल्याला आहे! महासागरासारखे !

त्यावेळी शंकराचार्यांनी हातातला दंड पाण्यामध्ये बुडवला, बाहेर काढला आणि आणि शिष्याला दाखवला. 'बघ किती पाणी आले? एक थेंब आला त्याच्यावर.' शंकराचार्य हसून म्हणाले, 'वेड्या, माझे ज्ञान किती आहे सांगू? अलकनंदेच्या पात्रात अवघे जल आहे ना, त्यातील अवघा एक बिंदू काठीला आला. तेवढेच माझे ज्ञान अवघ्या ज्ञानातील बिंदू एवढे आहे. आदी शंकराचार्य जर असे म्हणतात, तर मग तुम्ही-आम्ही काय म्हणायचे?
( संकलित , लेखक : अनामिक )